SHARE
लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या सोलापुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उतरला नसला, तरी राज ठाकरे हे राज्यभर फिरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या दोघांविरोधात प्रचार करत आहेत. या सभांमधील पहिली सभा नांदेडमध्ये झाल्यानंतर, दुसरी सभा आज म्हणजे 15 एप्रिल रोजी सोलापुरात होणार आहे. सोलापुरात आधीच चुरशीची लढत आहे, त्यात राज ठाकरेंची सभा होणार असल्याने चुरस आणखी वाढेल, यात शंका नाही.

SHARE