SHARE
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठवाड्यातील दुसरी सभा लातूर जिल्ह्यातील औसा इथे होत आहे. लातूर आणि उस्मानाबादच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची सभा असेल. भाजपा -शिवसेना युतीच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातले मिळून दीड लाखांवर लोक या सभेला येतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE