इंदापूर | उजनीच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 42 किलोंचा मासा सापडला!

SHARE
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या तीन तरुणाने टाकलेल्या जाळ्यात तब्बल 42 किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. उजनी धरण क्षेत्रात आजपर्यंत आढळलेला हा सर्वात मोठा असल्याचे सांगितलं जात आहे. नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकला. त्यांनी हा मासा आज इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील उपबाजारात विक्री करण्यास आणला होता. माशाची काही वेळातच 130 रुपये किलो या दराने 5500 रुपयांनी शंकर मोरे यांनी मासा विकत घेतला.

SHARE