भाजप प्रवेशाची घोषणा, रणजीतसिंह मोहिते पाटील यांचं संपूर्ण भाषण | अकलूज | एबीपी माझा

SHARE
राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा रणजितसिंह यांनी अकलूजमध्ये केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा का ? असा प्रश्न रणजितसिंह यांनी विचारताच हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने घोषणा देत भाजप प्रवेश करण्याच्या निर्णयाला समर्थन दर्शवलं. अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली. कृष्णाभीमा स्थिरीकरण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असं रणजितसिंह म्हणाले.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

SHARE