SHARE
‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा देत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची अयोध्यानंतर पंढरपुरात सभा होणार आहे. सोमवारी म्हणजे (दि. २४) येथील कॉलेज रोडवरील चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानात दुपारी सभा होणार आहे. या सभेसाठी जागोजागी लावण्यात आलेले भगवे झेंडे, स्वागत कमानींमुळे पंढरी नगरी भगवीमय झाली आहे. या सभेच्या तयारीसाठी सेनेचे खासदार संजय राउत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम आदींसह पक्षाचे अनेक खासदार, आमदार पंढरीत दाखल झाले आहेत. सोमवारी ठाकरे यांची दुपारी सभा आणि त्यानंतर सायंकाळी चंद्रभागा नदीवर आरती होणार आहे,

SHARE