SHARE
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (दि. 12) नगरमध्ये 'विजय संकल्प' सभा होणार आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची सभा होत असल्याने पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मोदींच्या सभेकडे जिह्याचे लक्ष लागले आहे. नगरमधील सावेडी उपनगर परिसरातील संत निरंकारी भवनाजवळील लोहार मळा येथे 21 एकरांच्या मैदानात सकाळी 9.30 वाजता ही सभा होणार आहे.

SHARE